Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आर्थिक व्यवहार करताना या चार तारखा ठेवा लक्षात.दंड भरण्यापासून वाचा!

 आर्थिक व्यवहार करताना या चार तारखा ठेवा लक्षात.दंड भरण्यापासून वाचा!


आर्थिक नियोजन करताना प्रत्येकाला वर्षातील काही तारखा  लक्षात ठेवं गरजेचं असतं. आर्थिक व्यवहारात करताना जर या तारखा चुकल्या तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या तारखा चुकल्या तर नुसता दंड नाही तर तुम्हाला अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं. आज आम्ही तुम्हाला तुमचं आर्थिक कॅलेंडर सांगणार आहोत. आणि या तारखा लक्षात ठेवा आणि आपले आर्थिक व्यवहार सुरळीत करा.

या 4 तारखा कुठल्या

1. टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरणे

2. वार्षिक जीएसटी रिटर्न भरणे

3. आयटीआर, केव्हीसी अपडेट भरणे

4. आधार पॅनशी लिंक करणे

तर 15 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 15 मार्च आणि 31 मार्च या तारखा महत्त्वाच्या आहेत.

1. 1 ते 15 फेब्रुवारी

15 जानेवारी ही तारिख टॅक्स ऑडिट रिपोर्टची महत्त्वाची तारीख आहे. कोरोना संकटामुळे ही तारीख वाढून 15 फेब्रुवारी करण्यात आली आहे. तरदुसरीकडे दंडाशिवाय टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत वेळ मागण्यात आला आहे. कारण हा रिपोर्ट भरताना आयटी पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिना आला आहे तर या तारखा विसरू नका.

2. 2 ते 28 फेब्रुवारी

वार्षिक जीएसटी रिटर्न 2020-21 भरण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी आहे. त्यामुळे हे काम लवकर करा. जर ही तारीख चुकली तर तुम्हाला दंड भरावा लागेल. खरं तर 31 डिसेंबरपर्यंत वार्षिक जीएसटी रिटर्न भरायचा होता. मात्र सरकारकडून ही तारीख 2 महिने पुढे ढकलण्यात आली. तर 28 फेब्रुवारीपर्यंत सीबीआयसीनुसार फॉर्म जीएसटीआर-9 आणि फॉर्म जीएसटीआर -9सी हे 2020-21 आर्थिक वर्षासाठी सेल्फ-सर्टिफाइड रिकांसिलेशन स्टेटमेंट तुम्ही दाखल करु शकता.

3. 3 ते 15 मार्च

कॉर्पोरेट क्षेत्रातील करदाते 15 मार्च ही तुमच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे. ऑडिट रिपोर्ट प्रकरणात आयकर रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख आहे. या तारखेला 2021-22 वार्षिक आयकर रिर्टन भरायचं आहे. तर 2020-21 साठी सरकारने रिटर्न भरण्याची तारीख तीन वेळा वाढवली आहे. कंपन्यांसाठी रिटर्न भरण्याची तारीख ही 31 ऑक्टोबर होती.

4. 4 ते 31 मार्च

31 मार्च ही सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे. या तारखेपर्यंत आपल्याला अनेक महत्त्वाचे कामं करुन घ्यायची आहेत. नाही तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपल्या बँक खात्यात केवायसी अपडेट केलं आहे का ते तपासून बघा. यासाठीही सरकारकडून अनेक वेळा तारीख वाढविण्यात आली आहे. तसंच आधार कार्ड पॅनशी लिंक केलं नसेल तर तेही त्वरित करुन घ्या. आज अनेक व्यवहार करताना पॅन आणि आधार लिंक असल्याशिवाय करता येत नाही. ईपीएफ खात्यातही पैसे जमा करण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे 2020-21साठी रिवाइज्ड रिटर्न भरण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.