Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'सेमी इंग्लिश मीडियम नको' म्हणत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

 'सेमी इंग्लिश मीडियम नको' म्हणत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास


सातारा, 30 जानेवारी : कोरोनामुळे  गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा  आता सोमवारपासून नियमित सुरू होणार आहे. पण, साताऱ्यात एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 'सेमी इंग्लिश मीडियम नको' या कारणातून गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात  घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात ही घटना घडली आहे. अनुष्का पवार असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी अनुष्काने चिठ्ठी लिहून ठेवली होती. शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या नववीत शिकणाऱ्या अनुष्का पवार या विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

"सेमी इंग्लिश मीडियम नको" या कारणातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. पोलिसांना घटनास्थळी चिट्ठी आढळून आली आहे. 

(काय आहे कारण) 

अनुष्का पवार ही घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.