सांगली : शहर पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस पत्रकार दिन म्हणून ललकार भवन सांगली येथे साजरा झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थिती होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केसरीचे हरीश यमगर यांनी केले. स्व. जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी, आमदार मानसिंगराव नाईक, संचालकपदी विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थ तिन्ही सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार व ललकारचे संस्थापक, संपादक बापूसाहेब खराडे, तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री, लोकमतचे श्रीनिवास नागे, पुढारीचे चिंतामणी सहस्त्रबुद्धे, जनप्रवासचे हणमंत मोहिते, लोकसत्ताचे दिगंबर शिंदे, सामनाचे प्रकाश कांबळे सांगली दर्पण चे विकास गोंधळे आदी उपस्थिती होते. ललकारचे संपादक सुभाष खराडे यांनी आभार मानले.सांगली पत्रकार दिन संपन्न
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.