Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे अ‍ॅडमिनला मिळणार ‘हा’ विशेष अधिकार

 व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे अ‍ॅडमिनला मिळणार ‘हा’ विशेष अधिकार


लवकरच एक नवे फीचर व्हॉट्सअ‍ॅप आणणार असून, ग्रुपच्या अ‍ॅडमिनला यामुळे ग्रुपवरील मेसेज सर्वांसाठीच डिलीट करता येणार आहेत (delete messages for everyone). ग्रुपच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेले मेसेज ग्रुपमधील सदस्यांनी बघायच्या आधी हटवण्याचा अधिकार यामुळे अ‍ॅडमिनला मिळणार आहे. ट्विटरवर Wabetainfoने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची सुविधा लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या येणाऱ्या अपडेटमध्ये तुम्हाला ग्रुपमधील मेसेज सर्वांसाठी डिलीट करता येणे शक्य होणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रेकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, एखादा अ‍ॅडमिन जेव्हा एखादा मेसेज डिलीट करतो, तेव्हा This was deleted by an admin अशी नोट दिसेल. मेसेज कोणत्या अ‍ॅडमिनने डिलीट केला आहे, हे देखील ग्रुपच्या सदस्यांना समजू शकेल. हे फीचर वापरात आल्यानंतर, ग्रुप अ‍ॅडमिनसाठी अश्लील किंवा आक्षेपार्ह संदेश हटवणे सोपे होईल. तसेच, ग्रुपच्या हिताच्या विरोधात जाणारे मेसेज काढून टाकण्यात अ‍ॅडमिनला मदत होईल.

‘डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ फीचरची वेळ मर्यादा वाढवण्याच्या शक्यतेवर व्हॉट्सअ‍ॅप काही दिवसांपूर्वी काम करत होते. सध्या, वापरकर्त्यांकडे एकदा पाठवलेला संदेश फक्त एक तास, आठ मिनिटे आणि सोळा सेकंदांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय आहे. परंतु व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रॅकर Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना मेसेज पाठवल्यानंतर सात ते आठ दिवसांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय मिळेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.