महाराष्ट्राला हादरवणारी घटना
लातूर, 08 जानेवारी: लातूर जिल्ह्यातील रेणापूर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरला आहे.
एवढंच नव्हे तर संबंधित शेतकऱ्यानेही विष प्राशन करून स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण ऐनवेळी 14 वर्षीय मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून मामाला कॉल करून घटनेची माहिती दिली. यानंतर मामाने घटनास्थळी धाव घेत, चौघांनाही रुग्णालयात दाखल केलं.
सुदैवाने चौघेही बचावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील रहिवासी असणारे शेतकरी आतिष बाबूराव नरके यांनी गुरुवारी आपण फिरायला जाऊ असं सांगत पत्नी विशाखा (34), मुलगा पारस (14) आणि लोकेश (12) यांना दुचाकीने अंबाजोगाईला घेऊन गेले. पण याठिकाणी राहण्यासाठी लॉज न मिळाल्याने आतिष आपल्या कुटुंबाला हॉटेलमध्ये जेवू घातलं आणि पुन्हा लातूरकडे निघाले. दरम्यान वाटेत असणाऱ्या शेरा गावाकडे त्यांनी दुचाकी वळवली आणि एका शेतातील उसाच्या फडाजवळ जाऊन दुचाकी थांबवली.
याठिकाणी नरके यांनी टॉनिक असल्याचं सांगून पत्नीसह दोन्ही मुलांना विष पाजलं. 'हे आई-बाबांना कळालं तर...';पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या तिघांची शुद्ध हरपल्यानंतर नरके यांनी तिघ्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केलं आणि ब्लेडने गळ्यावर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेनंतर काही वेळातच 14 वर्षीय पारसला जाग आली.
त्याने तातडीने आपल्या वडिलांच्या मोबाइलवरून आपले मामा श्रीकांत पवार (सुगाव, ता. अंबाजोगाई) यांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. मामाने क्षणाचाही विलंब न करता, आपल्या काही नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. 'हे जग खूप वाईट' म्हणत आईचं पोटच्या मुलींसोबत धक्कादायक कृत्य, वाचूनच उडेल थरकाप याठिकाणी पोहोचल्यानंतर, त्यांना मेहुणे आतिष नरके, बहीण विशाखा नरके, भाचा पारस आणि लोकेश सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात आढळले.
पारस थोडा शुद्धीवर होता तर इतर तिघे बेशुद्ध होते. मामा श्रीकांत पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना लातूरच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केलं. पारस आणि मेहुणे आतिष नरके शुद्धीवर आले आहेत. तर लोकेश आणि विशाखा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. चिमुकल्याच्या पाळण्याची दोरी ठरली गळफास; अकोल्यात तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीसह मुलांची हत्या करून आपणही आत्महत्या करणार होतो, अशी माहिती आतिष नरके यांनी आपल्या मेहुणे श्रीकांत पवार यांना दिली. यानंतर श्रीकांत पवार यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात शेतकरी आतिष नरके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.