Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुलाबराव पाटील यांना काँग्रेस कमिटीत अभिवादन

गुलाबराव पाटील यांना  काँग्रेस कमिटीत अभिवादन


सांगली, दि.२१:
सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन, सांगली येथे त्यांच्या प्रतिमेला नगरसेवक तौफिक शिकलगार, रवींद्र वळवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या वेळी पैगंबर शेख यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या जिवन कार्याविषयी सर्वांना माहिती दिली. प्रदेश अध्यक्ष असताना राज्यमंत्री पद मिळाले म्हणून नाकारणारे व आपल्या कार्य कौशल्यावर सांगली नगरीचे नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असे राजकिय धुरंधर व्यक्तीमत्व  होते.  आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करता सर्व सामान्य कार्यकर्ता व सहकार क्षेत्रासाठी समर्पित जीवन त्यांनी व्यतित केले.  इंग्रजीवर प्रभुत्व व सहकारातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून राज्यातच नव्हे तर दिल्लीत त्यांचा दबदबा होता. आभार मौला वंटमुरे यांनी मानले. 

यावेळी बाळासाहेब पाटील, नितीन चव्हाण, महावीर पाटील, सुरेश पट्टणशेट्टी, नामदेव पठाडे, आय्युब निशाणदार, सनी धोतरे, अशोक रासकर, प्रशांत देशमुख, काळे साहेब, ताजुद्दीन शेख, अजय देशमुख, अजित ढोले आदि मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.