Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आर्किटेक्ट ए एस साळुंखे यांचे निधन

 आर्किटेक्ट ए एस साळुंखे यांचे निधन 


सांगली दि. येथील सांगली अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष, इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे संस्थापक सदस्य, वास्तुविशारद आर्किटेक्ट आनंदराव सदाशिव साळुंखे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या साळुंखे अँड असोसिएट्स या फर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाचे गृह प्रकल्प उभारण्यात महत्त्वाचा सहभाग होता.इतकेच नव्हे तर पंढरपूर येथील नामदेव पायरी व महाद्वाराचे आरेखन व उभारणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. कोल्हापूर येथील विश्वपंढरी हा प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतूनच साकार झाला आहे. सांगलीतील अनेक सदनिका, कार्यालय आणि गृहप्रकल्प त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनातून साकार झाले आहेत.तरुण भारत स्टेडियम च्या उभारणीतही अण्णासाहेब गोटखिंडी यांच्याबरोबर त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. विमेंस एज्युकेशन सोसायटी, शिव सदन, सावरकर प्रतिष्ठान आदि संस्थांमध्येही एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा  परिवार आहे



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.