Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीला 'फर्स्ट क्लास', पुणे आठवे!

 सांगलीला 'फर्स्ट क्लास', पुणे आठवे!


किशोरवयीन मुलांच्या कोरोना प्रतिबंध लसीकरणात राज्य काठावर पास झाले आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये सांगलीला 'फर्स्ट क्लास' मिळाला असून, पुणे राज्यात अठराव्या क्रमांकावर असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.


राज्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. कामाच्या गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात ३६.०२ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली.

राज्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील ६० लाख ६३ हजार मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे निश्चित केले आहे. या मुलांना कोव्हॅक्सिन हीच लस देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील २१ लाख ८३ हजार ९७६ (३६.०२ टक्के) मुलांनी लस घेतली आहे. असे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.राज्यातील किशोरवयीन मुलांना लशीचे दोन डोस देण्यात येणार आहे. त्यापैकी एक डोस सध्या दिला जात आहे. यात सर्वाधिक लसीकरण सांगली जिल्ह्यात झाले आहे. तेथे एक लाख ४४ हजार ६१७ किशोरवयीन मुलांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी ९९ हजार ८९६ (६३.५४ टक्के) मुलांनी डोस घेतला आहे. त्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१.७० टक्के (२४ हजार ४९) मुलांनी लस घेतली.

 अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल ऑफिसर व सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांनी सांगली दर्पणशी बोलतांना दिली.तसेच त्यानी सांगितले की आजून कोणी लस घेतली नसेल तर लस घ्या असे आव्हान त्यानीं यावेळी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.