Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संयोगीता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाबराव पाटील संकुलामध्ये आदरांजली

संयोगीता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त  गुलाबराव पाटील संकुलामध्ये आदरांजली


मिरज, दि. २२ : येथील संयोगीता पाटील केंब्रिज स्कूलच्या संस्थापक - संचालक संयोगिता पृथ्वीराज पाटील यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या सर्व शाखांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 

 या कार्यक्रमासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

संयोगीता पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने इतरांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. बदलत्या काळानुसार शिक्षण प्रवाहही बदलला पाहिजे आणि हे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह होता. केंब्रिज स्कूलच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रयोग कृतीत आणले. सारे लक्ष त्यांनी केंब्रिज स्कुलवर केंद्रित केले. आदर्श शाळा म्हणुन त्या शाळेची जडण घडण केली. त्याच्या कामाची आजही या शैक्षणिक संकुलाला प्रेरणा मिळते, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.