Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवलापूर ग्रामपंचायत मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा भव्य मेळावा पार पडला

 कवलापूर ग्रामपंचायत मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा भव्य मेळावा पार पडला




कवलापूर ग्रामपंचायत मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती सांगली च्या अध्यक्षा ज्योती आदाटे आणि मिरजेच्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे उपस्थित होत्या यावेळी ज्योती आदाटे म्हणाल्या  ना.जयंत पाटील यांच्या शिफारशीनुसार आमची या महत्वाच्या पदावर निवड झाली असुन समिती स्थापन झाल्यापासून तळागाळातील लोकांपर्यंत अगदी वंचित घटकांपर्यंत या योजना पोहोचवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे अगदी कोरोनाच्या काळात सुध्दा भागाभागात जाऊन जिवाची पर्वा न करता मेळावे घेतोय प्रशिक्षण शिबीर घेऊन प्रशिक्षित करतोय या गावातील प्रत्येक वंचित घटकातील महिलांनी व वृद्ध निराधार लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा प्रस्ताव पुर्ण करुन देण्यासाठी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास गुंडे या गावच्या सरपंच आणि सर्व सदस्यांनी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.


पण जी काही लागतील ती कागदपत्रे देणे व त्यांचा पाठपुरावा करणे आपले कर्तव्य आहे तसेच कोणत्याही दलालामार्फत प्रस्ताव करू नये जेणे करुन तुमची आर्थिक पिळवणूक होऊ नये असे सांगून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर त्यांनी तोडगा सांगितला या योजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे व त्यासाठी लागणारी कागदपत्रे या सर्व गोष्टींचा उहापोह केला मिरजेच्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे यांनी ही मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी या गावच्या सरपंच शुभांगी नलवडे ग्रामपंचायत सदस्या उज्वला गुंडे सुषमा पाटील सारिका भोरे वंदना मोहीते शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे मिरज तालुका प्रमुख सुगंधा माने सरोजिनी माळी शबाना सत्तारमेकर आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे व असंख्य ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.