Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधराअंतर्गत महापालिका बांधकाम विभागाच्या भिंती बनल्या बोलक्या : महापौर आयुक्तांकडून उपक्रमाचे कौतुक

स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधराअंतर्गत महापालिका बांधकाम विभागाच्या भिंती बनल्या बोलक्या : महापौर आयुक्तांकडून उपक्रमाचे कौतुक


सांगली: स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कार्यालयाच्या आवारातील भिंती बोलक्या करल्या आहेत. या बोलक्या भिंतींची पाहणी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी करत उपक्रमाचे कौतुक केले.

    प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये बांधकाम विभागाने आपल्या कार्यालयाच्या आवारातील सर्व भिंती बोलक्या केल्या आहेत. या भिंतीवर स्वच्छता अभियान तसेच माझी वसुंधरा अंतर्गत विविध उपक्रमांबाबत प्रबोधनात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या बोलक्या भिंतींची पाहणी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी करीत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, शहर अभियंता संजय देसाई, अभियंता वैभव वाघमारे , तेजस शहा आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.