Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी नगराध्यक्ष जोतिराम मेथें गुरुजींचा सामाजिक उपक्रम राबवून प्रथम स्मृती दिन साजरा

 माजी नगराध्यक्ष जोतिराम मेथें गुरुजींचा सामाजिक उपक्रम राबवून प्रथम  स्मृती दिन साजरा 



मिरज :  जुन्या पिढीतील मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष  जोतिराम मेथे यांचा प्रथम  स्मृतिदिन सामाजिक कार्यकर्ते  धनराज  मेथे  यांच्या पुढाकाराने  विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला  सकाळी जोतिराम मेथे यांच्या प्रतिमेचे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


त्यानंतर मेथे कुटुंबीयांच्यावतीने  शहरातील स्टेशन चौक , रेल्वे स्टेशन, गांधी चौक, मिशन हाॅस्पिटल परिसरातील बेघराना चादर, संवेदना फौंडेशनच्या मनोरुग्नाना  तीन चाकी सायकल, तसेच बेघर व गोरगरिबांना भोजन देण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर डाॅ. राजेंद्र मेथे, सामाजिक कार्यकर्ते  संजय मेथे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सामाजिक उपक्रमात डाॅ. पृथ्वीराज मेथे , जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, डाॅ. ॠतुराज मेथे , धनराज मेथे प्रकाश सूरवसे, डाॅ. नम्रता मेथे, डाॅ. प्रियांका मेथे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  या उपक्रमाबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्ते धनराज मेथे म्हणाले, शहराच्या विकासासाठी आमचे आजोबा जोतिराम  मेथे गुरुजी यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदि क्षेत्रात प्रेरणादायी  आहे.  त्यामुळे  आजच्या पिढीला  त्यांच्या कार्याची ओळख  रहावी  या हेतूने मेथे गुरुजींच्या स्मृती दिनानिमित विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.