Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका प्रशासन अलर्ट

 महापालिका प्रशासन अलर्ट


सोमवारपासून महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनामध्ये नो मास्क नो एन्ट्री : मास्क शिवाय महापालिका कार्यालयात प्रवेश नाही: गर्दी दिसल्यास खासगी आस्थापनेवर कारवाई: मनपाक्षेत्रात विनामास्क, गर्दी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई: महापालिकेकडून कारवाईसाठी 10 पथके नियुक्त: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती: 

सोमवारपासून महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनामध्ये नो मास्क नो एन्ट्रीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणालाही मास्क शिवाय महापालिका कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही तसेच खासगी आस्थापना धारकांनी सुद्धा विनामास्क कोणालाही प्रवेश देऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. 

   मनपा आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढत आहे. याबाबत राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोमवारपासून महापालिका क्षेत्रात या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. अनेक खासगी अस्थापणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्यास खासगी आस्थापनावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आस्थापना धारकांनी आपल्या अस्थापणामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

सोमवारपासून मनपाक्षेत्रात विनामास्क, गर्दी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक

कारवाई केली जाणार आहे. यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात महापालिकेकडून कारवाईसाठी 10 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वानी मास्क वापरणे बंधनकारक आहे. याचबरोबर हे पथक खासगी अस्थापणाना सुद्धा अचानकपणे भेटी  गर्दीबाबत तपासणी करणार आहे. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी राहणार असून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. कोरोना रुग्ण संख्या पाहता गरज भासल्यास महापालिकेचे जीपीएम कोव्हिडं सेंटर पुन्हा कार्यन्वित केले जाणार असून महापालिका ऑक्सिजन प्लांट सुद्धा तयार असंल्याचेही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी  सांगितले. महापालिकेकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वानी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि गर्दी टाळावी असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

लसीकरणावर अधिक भर देणार: कापडणीस

महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. 15 ते 18 वयोगटाचे लसीकरण शाळांमध्ये केले जात आहे तसेच मनपाच्या दवाखान्यात सुद्धा केले जात आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपला पहिला आणि दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे

मनपाक्षेत्रात आर्टिपीसीआर तपासण्या वाढविणार: कापडणीस

मनपाक्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली वेळेत तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान झाल्यास कोरोना संसर्ग वाढीला ब्रेक बसेल त्यामुळे मनपा क्षेत्रात जास्तीजास्त आर्टिपीसीआर चाचण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.