Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अटल भूजल योजनेवर आधारीत चित्ररथाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

 अटल भूजल योजनेवर आधारीत चित्ररथाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन


सांगली, दि. 26, : ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी पडणारा पाऊस त्यापैकी किती पाणी अडविले जातो, किती पाणी जमिनीत मुरते, जमिनीतून नेमके उपसले जाते ते पाणी पिकांसाठी, जनावरांसाठी, मानवी वापरासाठी किती वापरले जाते, एकूण पाण्याची मागणी किती, आजमितीला पाण्याचा पुरवठा किती, एकूण मागणी पूर्ण करावयाची झाल्यास कोणत्या उपायोजना कराव्या लागतील याचा तांत्रिक व सामाजिक पध्दतीने केलेला अभ्यास व त्याची केलेली मांडणी म्हणजेच जल सुरक्षा आराखडा होय. ग्रामपंचायत स्तरावरील महिला व वंचितासह सर्वच घटकांच्या सहभागाने आणि सहमतीने जलसुरक्षा आराखडा तयार करणे हा अटल भूजल योजनेचा सर्वात मोठा भाग आहे. याचीच माहिती दर्शविणाऱ्या चित्ररथाचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते आज हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. हा चित्ररथ वरिष्ठ भूवैज्ञानीक भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांनी तयार केला आहे.


या चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार गिरीष बापट, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, सहाय्यक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, शाखा अभियंता निलेश जाधव, वाहिद शेख, नागनाथ पाटील, अभिजीत शिंगाडे, शेखर अडविलकर, एस. आर. पवार, प्रणित कुंभार, विकास पाटील आदि उपस्थित होते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.