Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेच्या स्वच्छता, माझी वसुंधरा उपक्रमात सहभागी व्हा: ब्रँड अँबेसिडसर डॉ. दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन यांचे आवाहन: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या टीमचेही केले कौतुक

सांगली महापालिकेच्या स्वच्छता, माझी वसुंधरा उपक्रमात सहभागी व्हा:  ब्रँड अँबेसिडसर डॉ. दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन यांचे आवाहन: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या टीमचेही केले कौतुक


सांगली: सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता, माझी वसुंधरा अंतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे ब्रँड अँबेसिडसर डॉ. दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन यांनी केले आहे. तसेच महापालिकेचे ब्रँड अँबेसिडसर म्हणून निवड केल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस यांचे आभार मानले.

     सांगली मिरज आणि कुपवाड  महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडसर डॉ. दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन यांचा महापालिकेचे ब्रँड अँबेसिडसर म्हणून निवड झाल्याबद्दल उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्याहस्ते पटवर्धन दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महापालिकेच्या स्वच्छता, माझी वसुंधरा उपक्रमात सहभागी व्हा तसेच प्लास्टिक वापरणे टाळा आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढे या तसेच जास्तीजास्त झाडे लावा आणि त्याचे संवर्धन करून 

पर्यावरणाचे रक्षण करा असे आवाहन यावेळी डॉ पटवर्धन दाम्पत्यानी केले. तसेच महापालिकेच्या यापुढील सर्व उपक्रमात आम्ही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या महापालिकेचे नाव जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीही डॉ. दिलीप पटवर्धन यांनी दिली. यावेळी बोलताना माधवी पटवर्धन यांनी प्लास्टिक कचरा हा पर्यावरणाबरोबर मानवी शरीराला सुद्धा घातक आहे त्यामुळे प्लास्टिक टाळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक टाळण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाबद्दल आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी महापालिकेचे ब्रँड अँबेसिडसर डॉ पटवर्धन दाम्पत्याना माहिती दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.