Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेस टू झिरो मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या उपस्थितीत महापालिकेत कार्यशाळा संपन्न

 रेस टू झिरो मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या उपस्थितीत महापालिकेत कार्यशाळा संपन्न


सांगली: रेस टू झिरो या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत महापालिकेत कार्यशाळा संपन्न झाली.

          सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका रेस टू झिरो मोहिमेत सहभागी  झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हवामानात होणारे बदल रोखण्यासाठी रेस टू झिरो ही मोहीम जागतिक  राबविण्यात येत आहे. येत्या २०४० पर्यंत जागतिक पातळीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि २०५० पर्यंत ते शून्यावर आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला परिणामकारक पावले उचलावी लागणार आहेत. 


रेस टू झिरो ही मोहीम पर्यावरणातील कार्बन कमी करणे हे आहे. ह्या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता पूनम वर्मा यांनी दिली तसेच आयुक्त नितीन कापडणीस यांनी  मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके,आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, शहर अभियंता संजय देसाई आणि सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.