Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनाची तिसरी लाट ओसरली? मुंबईत कोविड बाधितांच्या संख्येत अचानक मोठी घसरण

 कोरोनाची तिसरी लाट ओसरली? मुंबईत कोविड बाधितांच्या संख्येत अचानक मोठी घसरण


मुंबई, 12 जानेवारी : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड बाधितांच्या संख्येत घसरण  झाली आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या पॉझिटिव्हिटी रेट 28 टक्के होता तो मंगळवारी घसरुन 18.7 टक्यांवर पोहोचला आहे. याच संदर्भात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी म्हटलं, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आणि आता लवकरच रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते.या आकडेवारीत आम्ही आणखी घसरण होण्याची अपेक्षा करतो. डॉ शशांक जोशी पुढे म्हणाले, "गेल्या तीन ते चार दिवसांत आम्ही एक ट्रेंड पाहिला आहे ज्यामुळे तीन कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत कमी होऊ शकते. पहिलं कारण म्हणजे बरेच नागरिक आता घरी आहेत आणि ते सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांची टेस्ट होत नाहीये. दुसरं कारण असं की, बरेच नागरिक स्वत: टेस्टिंग करत आहेत आणि त्यासंदर्भातील माहिती ते देत नाहीयेत.

तिसरं कारण असं की, आपल्याला बाधितांची अचूक संख्या माहिती नाहीये." वाचा : ताप, सर्दी-खोकल्याखेरीज कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ही नवी लक्षणं महाराष्ट्र आणि मुंबईत सोमवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घसरण झाली आहे. मुंबईत कमी रुग्ण आढळून येण्याला तज्ज्ञ 'संडे इफेक्ट' म्हणत आहेत तर त्याचवेळी काही तज्ज्ञ याला चांगले संकेत मानत आहेत. सोमवारी कोरोना बाधितांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. शहरात रविवारी एकूम 19 हजार 474 बाधितांची नोंद झाली होती आणि पॉझिटिव्हिटी दर हा 23 टक्क्यांवर होता.

आकडेवारीवर नजर टाकली तर, 7 जानेवारीपासून मुंबईत कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घसरण होत आहे. शुक्रवाीर मुंबईत 20 हजार 971 बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी 20 हजार 318 तर रविवारी 19 हजार 474 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी मुंबईत 13 हजार 648 बाधितांची नोंद झाली आहे.

वाचा :

मुंबईत ओसरली कोरोनाची तिसरी लाट? आश्चर्यकारक नवी आकडेवारी समोर मंगळवारी (11 जानेवारी) मुंबईत 11 हजार 647 रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच दिवसातलीही सर्वात कमी संख्या आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. मंगळवारी मुंबईत 11,647 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 9667 रग्णांना लक्षण आढळून आलेली नाहीत. तर रूग्णालयातील 14980 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.