Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : वडूजला नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सहा तर काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : वडूजला नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सहा तर काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी



सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता वडूज नगरपंचायतीचा निकाल हाती आलेला आहे. या ठिकाणी भाजपाला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 5, काँग्रेसने 1,अपक्षमधून 4 , वंचित आघाडीतून 1 अशा एकूण 17 जागेवरून उमेदवार निवडून आले आहेत.वडूज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आरती काळे, शोभा वायदंडे, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे हे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून अभय देशमुख हे निवडून आले आहेत. तर भाजपमधून रेखा माळी, रेश्मा बनसोडे, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, ओंकार चव्हाण, जयवंत पाटील हे निवडून आले आहेत. अपक्ष म्हणून मनीषा काळे, राधिका गोडसे, मनोज कुंभार, सचिन माळी हे निवडून आले आहेत. वंचित आघाडीतून शोभा बडेकर या विजयी झाल्या आहेत.

वडूज नगरपंचायतीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा निवडून आणल्या आहेत. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला असून या पक्षाच्या पाच जागा विजयी झाल्या आहेत. तर अपक्षमधून चार जागा निवडून आल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.