Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना समाजरत्न पुरस्कार...

 नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना समाजरत्न पुरस्कार...


सांगली : फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील नेते,सांगलीचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना प्रतिष्ठा फौंडेशन चा राजस्तरीय समाजरत्न पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला.

       सालाबाद प्रमाणे यावर्षीचा प्रतिष्ठा फौंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात काम करणा-या राज्यभरातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.


नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.आज तासगांव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.जगन्नाथ ठोकळे हे गेली 36 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करित असुन विविध शासकीय समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.दलित,शोषित व मागासवर्गीय समाज्यावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात त्यांनी अनेक लढे उभारले आहेत.सध्या ते रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,स्थायी समितीत सदस्य,प्रधानमंत्री आवास योजना संनियंत्रण समिती अध्यक्ष तसेच नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.