Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असेल एखादे अकाऊंट, तर 'हा' नंबर तुमच्या मोबाइलमध्ये आवश्यक करा सेव्ह

जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असेल एखादे अकाऊंट, तर 'हा' नंबर तुमच्या मोबाइलमध्ये आवश्यक करा सेव्ह



नवी दिल्ली :  तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते  उघडले असेल किंवा पोस्ट ऑफिसच्या एखाद्या योजनेशी  संबंधित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

भारतीय टपाल विभागाने नवीन इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) सेवा सुरू केली आहे. याच्या मदतीने तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या विविध लहान बचत योजनांची माहिती मिळवू शकता. 

ही पूर्णपणे संगणकीकृत सेवा आहे. ग्राहक पीपीएफ (PPF), एनएससी (NSC), सुकन्या समृद्धी (SSY) किंवा लहान बचत योजनांबद्दल तपशीलवार माहिती आयव्हीआरद्वारे मिळवू शकतात. इंडिया पोस्टने यासाठी 18002666868 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून कॉल करून, ग्राहक कोणत्याही योजनेच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतो.

असा चेक करा बॅलन्स

जर तुम्हाला PPF किंवा इतर कोणत्याही योजनेचे खाते तपासायचे असेल, तर प्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18002666868 डायल करा. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी 1 नंबर दाबा. इंग्रजीसाठी 2 नंबर दाबा. यानंतर, कोणत्याही योजनेच्या खात्याचा बॅलन्स जाणून घेण्यासाठी 5 दाबा. त्यानंतर फोनमध्ये खाते क्रमांक टाका. नंतर हॅश (#) दाबा. यानंतर तुम्हाला फोनवर तुमच्या खात्यातील शिल्लक सांगितली जाईल.

असे ब्लॉक करा कार्ड

तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचे एटीएम असेल आणि तुम्हाला कार्ड ब्लॉक करायचे असेल तर हे कामही आयव्हीआरद्वारे केले जाईल. एटीएम कार्ड बंद करण्यासाठी 18002666868 डायल करा. नंतर 6 दाबा. त्यानंतर तुमचा कार्ड नंबर टाका. त्यानंतर खाते क्रमांक टाका. नंतर 3 दाबा. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवेसाठी तुम्हाला 2 नंबर दाबावे लागतील. त्याच वेळी, इतर सेवांसाठी, 7 नंबर दाबावा लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.