महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना सांगली जिल्हा
आज वानलेस हॉस्पिटल मिरज येथील भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्या वतीने सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणास भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
साधारण पाचशे ते साडेपाचशे, सर्व श्रेणी तील कर्मचाऱ्यांचे वेतन एक ते दीड वर्ष पासून थकीत आहे हॉस्पिटलच्या जबाबदार प्रशासनाने कर्मचारी वर्गाशी चर्चा करून थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावा वा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना या बेजबाबदार प्रशासनाच्या विरोधात जोरदार लढा उभा करेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहित घुबडे -पाटील ,मिरज तालुकाध्यक्ष प्रसाद खवाटे, मिरज तालुका उपाध्यक्ष विजय मौर्य, सांगली शहर उपाध्यक्ष निखिल कुलकर्णी ,कुपवाड शहराध्यक्ष रोहन संकपाळ, निखिल कोळी अक्षय चव्हाण अजिंक्य करजगार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.