Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संघटनेतर्फे समाजाभिमुख उपक्रम राबवणार

 संघटनेतर्फे समाजाभिमुख उपक्रम राबवणार


सांगली इंडियन डेंटल असोसिएशनच्या. सांगली जिल्हाध्यक्षपदी येथील डॉ. रामदास हजारे यांची सलग चौथ्यावर्षी फेरनिवड करण्यात आली आहे. तर संघटनेच्या सचिवपदी डॉ. किशोर राठी आणि खजिनदारपदी डॉ. शिवाजी पांढरे यांच्या निवडी झाल्या आहेत.

इंडियन डेंटल असोसिएशनची बैठक झाली. यात गेल्या वर्षभर संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची चर्चा झाली. कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून दंतरोग तज्ज्ञांनी केलेल्या सेवेबद्दल अभिनंदन करण्यात आले. यापुढेही रूग्णसेवेची परंपरा अशीच चालू ठेवण्याची ग्वाही उपस्थित डॉक्टरांनी दिली.


संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास हजारे यांच्यासह डॉ.राठी व डॉ. पांढरे यांनी केलेल्या कामाबाबत उपस्थित सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केल्याने यापुढेही त्यांचीच निवड कायम करण्याचा निर्णय घेतला. डॉ. स्वप्निल चोपडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नव्याने निवड केली. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीनिवास अष्टेकर यांचा सत्कार केला. दातांच्या आरोग्यासाठी जनजागृती बरोबर वर्षभरात संस्मरणीय कार्यक्रम संघटनेमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ. हजारे यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.