Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा .. सांगली शहर भाजपची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा .. सांगली शहर भाजपची मागणी                                                                                


सांगली दि.१८ :
काल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि बेजबाबदार  वक्तव्य केलेले आहे. त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून मी मोदीला मारू शकतो मी मोदीला शिव्या देऊ शकतो म्हणून घाबरून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला नाही अशा प्रकारचे अत्यंत विखारी विधान जाहीर रित्या केले आहे. वास्तविक पंतप्रधान हे कोण्या एका पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. अशावेळी देशाच्या पंतप्रधान बद्दल जाहीरपणे त्यांना मारण्याची व शिव्या देण्याची भाषा वापरणे  निंदनीय आहे. नुकताच पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षतेच्या संबंधी घडलेला गैरप्रकार पाहता नाना पटोले यांचे विधान पोलिसांनी गंभीर रित्या घेणे गरजेचे आहे. 

नाना पटोले यांच्या बेजबाबदार विधानाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत मोदी द्वेषाच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी सांगली शहरच्या वतीने  जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी  सांगलीचे पोलीस निरीक्षक यांच्या कडे केली आहे यावेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील,  माजी महापौर संगीताताई खोत नगरसेविका सविता मदने, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अशरफ वांकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, डॉ. भालचंद्र साठे, सरचिटणीस केदार खाडिलकर, जगन्नाथ साळुंखे, अविनाश मोहिते, राजू मदने, अजिंक्य हंबर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.