Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्‍या वतीने पंतप्रधान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने

 सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्‍या वतीने पंतप्रधान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने


सांगली: दि. २५ :  सांगली जिल्‍हा महिला काँग्रेस च्या वतीने राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्‍यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील यांच्‍या उपस्थितीत सांगली जिल्‍हा कॉंग्रेस कमिटी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या वक्‍तव्‍याचा निषेधार्थ निदर्शने करण्‍यात आली.

यावेळी श्रीमती शैलजाभाभी पाटील यांनी आपले विचार मांडले कि, आज देशाचे पंतप्रधान जर बोलण्याच्या ओघात " बेटी बचाओ बेटी पटाओ " म्हणत असतील तर यातुनच भाजपा ची मानसिकता दिसून येते. देशभरात  घडणाऱ्या अनेक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. उदाहरण द्यायचंच झाले तर उत्तर प्रदेशातील उन्नाव, मिर्झापूर, सतना मध्यप्रदेशातील पन्ना, पश्चिम बंगाल मध्ये बिरभूम, अशा अनेक प्रकारणांमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी आहेत. आता तर खुद्द देशाचे पंतप्रधान बेटी पटाव म्हणतायेत. मुंबई भाजपचे एक आमदार मुलींना पळवून आणण्याचा सल्ला देतायेत. मी देशातील माता भगिनींना आव्हान करते, ज्यांना देशातील मुलींचा आदर करता येत नाही अशा पक्ष नेतृत्‍वाला आणि पक्षाला आपल्या देशातून, हद्दपार करायची वेळ आली आहे.

यावेळी सांगली शहर महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा करुणा सॅमसन, नगरसेविका शुभांगी साळुंखे, मदिना बारुदवाले, माधवनगरच्‍या माजी सरपंच शोभा चव्‍हाण, आरती गुरव, जन्‍नत नायकवडी, शमशाद नायकवडी, मायाताई आरगे, सुमन कांबळे, मिनाक्षी दुग्गे, मानसी पाटील, वैष्‍णवी देशमुख, श्रध्‍दा देशमुख, गितांजली पाटील, श्‍वेता पाटील, प्रणाली कदम, राणी पाटील, अनिता भगाटे, सुप्रिया सुर्यवंशी, वैशाली सुर्यवंशी, ममता कुंभार, सविता अरकेरी, स्नेहा पारसे, सुनिता मदने  इत्‍यादी कॉंग्रेस पक्षाच्‍या महिला पदाधिकारी उपस्थित होत्‍या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.