Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सलमानच्या फार्महाऊसमध्ये अनेक मृतदेह पुरलेले." ; सलमानच्या शेजाऱ्यांचा धक्कादायक आरोप

"सलमानच्या फार्महाऊसमध्ये अनेक मृतदेह पुरलेले." ; सलमानच्या शेजाऱ्यांचा धक्कादायक आरोप


सलमान खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आणि देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या पनवेल फार्महाऊसचा शेजारी असलेल्या केतन कक्करविरोधात मानहानीचा खटला लढवत आहे.या शेजाऱ्याने सलमान खानवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

कोण आहेत कक्कर?

कक्कर हे यूएस-स्थित निवृत्त अनिवासी भारतीय आहेत ज्यांच्याकडे पनवेलमधील एका टेकडीवर, सलमानच्या फार्महाऊसशेजारी असलेल्या भूखंडाचा काही भाग आहे. अलीकडेच, त्यांच्यावर दबंग स्टारची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याचा आरोप आहे, त्यानंतर सलमानने कक्करवर मानहानीचा खटला दाखल केला. आता त्याने पुन्हा एकदा सुपरस्टारवर गंभीर आरोप केले आहेत.

केतन कक्करने एका स्फोटक मुलाखतीत, सुपरस्टार सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसमध्ये "चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले आहेत" असा धक्कादायक आरोप केला आहे, अशी बातमी एका वृत्तबवहीनीच्य बातमीत आहे. एवढंच नाही तर सलमान मुलांची तस्करीसारखी बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यूएस स्थित निवृत्त एनआरआयने यापूर्वी यूट्यूब मुलाखतीत सलमानबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. या आरोपांना उत्तर देताना सलमानने मुंबई दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. गेल्या आठवड्यात एक सुनावणी झाली ज्यामध्ये सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी कक्करच्या आरोपांचा मोठा भाग वाचून दाखवला. गांधी म्हणाले की त्यांनी अनावश्यकपणे सलमानची धार्मिक ओळख अनेक गोष्टींमधील वादात ओढली. ज्यावर सलमान खानच्या वकिलाने सांगितले की, "योग्य पुराव्याशिवाय, हे सर्व आरोप प्रतिवादीच्या कल्पनेचे चित्रण आहेत. मालमत्तेच्या वादात तुम्ही माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेला का बदनाम करत आहात? तुम्ही धर्म का आणत आहात? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आहेत आणि माझ्या भावांनी हिंदूंशी लग्न केले आहे. आम्ही सर्व सण साजरे करतो.", असे सलमानच्या बाजूने वकिलाने सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.