Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

त्या गरीब अडाणी ऊपाशी जनतेला गांधी कळला तर मग आजचया श्रीमंत सुशिक्षित तुपाशी जनतेला गांधी का कळला नाही ?

त्या गरीब अडाणी ऊपाशी जनतेला गांधी कळला तर मग आजचया श्रीमंत सुशिक्षित तुपाशी जनतेला गांधी का कळला नाही ?


त्या गरीब अडाणी ऊपाशी जनतेला गांधी कळला तर मग आजचया श्रीमंत सुशिक्षित तुपाशी जनतेला गांधी का कळला नाही ? किंबहुना त्यांना गांधी कळूनच घ्यावा असे वाटत नसेल कारण गांधी कळण्यासाठी स्वत: चा विवेक जागृत करावा लागेल. चार चौघात गांधी ला अपशब्द वापरले कि आपण कोणीतरी महान विचारवंत आहोत व आपल्यालाच सर्व ज्ञात आहे अशी अविवेकी मंडळी पावला पावलावर भेटतात . ज्या ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं ते सुद्धा गांधीपुढे हतबल झाले त्यांना गांधी चांगलाच कळला. उच्च वर्णिय व धर्माचे तथाकथित ठेकेदार यांना गांधी कधी कळलाच नाही असा समज जो पसरवला गेला तो एकदम खोटा होता कारण यांनाच गांधी फार लवकर कळला होता म्हणूनच गांधीला मारण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला कारण गांधी जे स्वातंत्र्य मागत होता ते यांना अपेक्षित नव्हते . गांधी कशासाठी लढा देत होते ? सामाजिक स्वातंत्र्या साठीच ना ? मग कुणाला सामाजिक स्वातंत्र्य नको होते ? 

गांधी म्हणत होते * जे इतरां च्या कषटावर जगताता ते सर्व चोर आहेत * मग याचा कुणाला राग येत होता ? अगदी टिळक व सावरकरांना सुद्धा हे गांधीचे तत्व मान्य नव्हते ! देशाची फाळणी केली म्हणून गांधीची हत्या केली हे खोटे कारण देवून खरे कारण लपवून ठेवायचे प्रयत्न आजही चालू आहेत. फाळणीची मुहूर्तमेढ १९१६ सालीच रोवली गेली होती लखनौ मध्ये त्या कराराला *लखनौ करार *  म्हणतात . त्या करारावर लोकमान्य टिळक व बॅ. जीना यांच्याच सहया आहेत , मग गांधींचा संबंध येतोच कुठे ?

दुःख याचं वाटतय कि आज च्या शिक्षीत बहूजनांना गांधी समजावून सांगावा लागतोय. जाती-जातीत गुरफटलेलया बहूजनांकडून काय अपेक्षा करायची. जे महामानव छत्रपती शिवाजीराजे , संभाजीराजे , महात्मा गांधी , शाहू महाराज , महात्मा फुले , डाॅ. आंबेडकर , महात्मा बसवेश्वर यांनी बहूजनांसाठी आयुष्य पणाला लावलं त्यांची रोज हत्या होत असताना बहुजन जात धरून बसलेत! ज्यांनी कोणी आयुष्यात हिंसेचा सामना केला नाही त्याला अहिंसेचे महत्व कळणार नाही . मग ती हिंसा फक्त रक्तपातच नाही तर वैचारीक हिंसा , खोटे बोलून एखाद्याला बदनाम करणे , स्वःतचया अहंकारापोटी दुसरयाला त्रास देणे , सत्तेचा व पदाचा अतिरेकी वापर करून अन्याय करणे , स्वःताची दुषकृतय लपवण्यासाठी संत असल्याचा आव आणणे ... याही हिंसेचया व्याख्या आहेत. 

जी अमेरिका जिने जगभर हिंसा केली त्याबलाढ्य अमेरिकेवर २६-११ चा भयानक हल्ला झाला त्या वेळेसअध्यक्ष बुश हे ढसाढसा रडले व त्यांनी * We need Gandhi * हे वाक्य वारंवार वापरले.स्वातंत्र्य हे अतिरेकी स्वातंत्र्य नसावे हे पण गांधींना मान्य होते.

आज महात्मा गांधीचा स्मृती दिन ! माझ्या वैचारीक कुवतीनुसार अगदी थोडेसे लिखाण शिवाजी पाटील , सांगली३०/०१/२०२२


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.