Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

 

महिलांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या


 


केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. त्यांच्यासा खास योजना आणली आहे. महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेतील महत्त्वाचा हेतू आहे.

केंद्र सरकारने महिलांचा विचार करुन 'पंतप्रधान मातृत्व वंदना योजना' आणली आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून महिलांना ६ हजार रुपये मिळणार आहे. काय आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जाणून घ्या. 

केंद्र सरकारने देशातील महिलांच्या दृष्टीने पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणली आहे. १ जानेवारी २०१७ मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेतंर्गत आधी पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत होती. पंतप्रधान गर्भावस्था मदत योजना या नावाने ही योजना आधी ओळखण्यात येत होती. म्हणजेच गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडिलांचे आधार कार्ड, आई वडिलांचे ओळखपत्र, मुलाचा जन्मदाखला आणि बँक खात्याचे पास बुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.

चार टप्प्यात असे मिळणार पैसे

आई आणि मुलांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारकडून या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महिलांना हे पैसे तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येतील आणि बाळाचा जन्म झाल्यावर शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील १ हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.