Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज जाहीर करण्यात आला

सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज जाहीर करण्यात आला 



दि 16 जानेवारी 2022: पश्चिम महाराष्ट्राचे पहिले सहकार महर्षी व पहिल्या विधिमंडळाचे सदस्य कै सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने दिला जाणारा सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज जाहीर करण्यात आला तशी माहिती सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा संदीप साठे यांनी दिली महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये सहकार महर्षी गणपतराव साठे यांचे मोठे योगदान आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा भूविकास बँकेचे मार्गदर्शक माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक जिल्हा खरेदी विक्री संघाचे संस्थापक महाराष्ट्रातील पहिल्या जि.प. प्रशालेचे संस्थापक आदी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजासाठी काम केले 14 जानेवारी 19 46 साली जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले होते त्याच्या अमृत महोत्सवी हे वर्ष चालू आहे त्यांच्या या कार्याची आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.


 यापूर्वी हा पुरस्कार पद्मभूषण माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व खासदार कल्लाप्पांना आवाडे यांना सन्मानपूर्वक सोलापूर जिल्ह्याचे त्यावेळचे पालक मंत्री मा विजयसिंह मोहिते पाटील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील दिवंगत गणपतराव देशमुख मा रामदास आठवले वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा विठ्ठल पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे मा प्रकाश आवाडे आमदार राजन पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले चालू वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर करत आहोत स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम या स्वरूपामध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे मा बाळासाहेब थोरात हे 1985 पासून विधिमंडळामध्ये आमदार मंत्री म्हणून काम करत आहेत संगमनेर तालुक्यामध्ये त्यांचे वडील दिवंगत स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारामध्ये मोठे योगदान दिले त्यांचाच वारसा माननीय बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे सहकारी साखर कारखाना दूध उत्पादक संघ कृषी उत्पन्न बाजार समिती विविध शिक्षण संस्था मजूर संस्था आधीच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळ दिले तसेच महाराष्ट्राचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव योजना राबवल्या या सर्व बाबींचे त्यांचे योगदान लक्षात घेता सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार त्यांना आज जाहीर करण्यात येत आहे लवकरच महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री महोदयांची वेळ घेऊन  हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा संदीप साठे यांनी दिली


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.