शिविगाळ केली म्हणून मुलगा वडिलांची हत्या करू शकत नाही; न्यायालयाने फटकारले
कोणत्याही वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणे आपल्याला शिवकलं जातं. परंतु अलीकडे वयाचे भान विसरत लहान-मोठ्यांचा विचार न करता कुणीही कुणालाही शिविगाळ करायला किंवा मारहान करायलाही मागे पुढे बघत नाही. म्हणून आता चक्क कोर्टालाच याबाबत नियम करून त्याची सुनावणी करण्याची वेळ आली आहे.कोणत्याही वयस्कर माणसाला ठार मारण्यासाठी चिथावणी कोणीही देऊ शकत नाही, असा पवित्रा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच जाहीर केला आहे. कोल्हापूर आणि शिर्डी येथील पुजारी असलेल्या पुरुषाची शिक्षा कायम ठेवत खंडपिठाने हा निर्णय दिला आहे.
कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली त्याची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टानेही कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विश्वास जाधव आणि संदिपकुमार मोरे यांच्या खंडपीठासमोर उस्मानाबादचे रहिवासी असलेले 29 वर्षीय नेताजी तेले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. नेताजी यांना डिसेंबर 2014 मध्ये एका वयस्कर व्यक्तीला शिवीगाळल केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
फिर्यादीच्या खटल्यानुसार, नेताजी हे कोल्हापूर आणि शिर्डी येथील मंदिरांचे पुजारी होते. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानी मंदिरात पुजा करणे सोडून कुठेतरी काम करावे आणि स्वत:चे चांगले भविष्य घडवावे. मात्र डिसेंबर 2013 मध्ये नेताजींच्या वडिलांनी त्यांना फटकारले आणि जर त्याने काही योग्य काम केले नाही तर घरी येऊ नको असे. वडिलांच्या या टोमण्याला त्रासून आणि रागाच्या भरात नेताजींनी आपल्या वृद्ध वडिलांना श्रीमुखात लगावली.
वडिलांनी त्यांच्या या वागण्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित करताच मुलगा नेताजीने आपल्या वडिलांवर चक्क चाकू काढला आणि आपल्या वडिलांवर वार केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि नेताजींनी न्यायमूर्ती जाधव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला रागाच्या भरात मी हे कृत्य केल्याचे सांगितले.वडिलांनी मला केलेल्या शिवीगाळामुळे मी अचानक भडकलो, मला राग अनावर झाला, असा युक्तिवाद पुजारी नेताजीने केला. त्याने आपल्या वडिलांची हत्या केल्याने त्याच्या या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जावू शकत नाही, वडिलांनी आपल्या मुलाला खडसावले असे जरी आपण गृहीत धरले तरी, अशा गोष्टिमुळे कोणत्याही व्यक्तीने आपल्या रागावरील नियंत्रण गमाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे नेताजीने केलेले कृत्य गुन्हाच सिद्ध होत असल्याचे न्यायाधीश म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.