श्री बाबासाहेब अण्णा पाटील रा. बोलवाड यांच्याकडून सभा आणि शाखाना रु.५.५० लाखांची देणगी
बोलवाड येथील ध.श्री. बाबासाहेब अण्णा पाटील (सतूबाई) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सभेच्या लक्ष लक्ष शाश्वत शिष्यवृत्तीसाठी रु. १ लाख, चिरंजीव इंजिनअर श्री. सुनील बाबासाहेब पाटील यांच्या नावे शेठ रा ध दावडा जैन बोर्डिंगसाठी रु. २.५० लाख व सौ. सुनंदा बाबासाहेब पाटील यांच्या नावे श्रीमतीबाई कळंत्रे श्रविकाश्रमास रु. २ लाख असे एकूण ५.५० लाख रुपये देणगी सुपूर्द करण्यात आले.पाटील परिवाराचा सन्मान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमंहामंत्री डॉ. अजित पाटील,बोर्डिंग चेअरमन राहुल चौगुले, आश्रम चेअरमन कमल मिनचे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी महामंत्री शांतीनाथ नंदगावे,महिला महामंत्री भारती चौधरी, सौ. बिना सुनील पाटील,मुलगा चि. सौरभ सुनील पाटील,मुलगी कु. विजया सुनील पाटील, सतीश आरवाडे, डॉ. देवपाल बरगाले, मदन पाटील, सुनीता चौगुले, रेखा पाचोरे, सुलोचना पाटील, सुप्रिया कवठेकर आदी उपस्थित होते. पाटील परिवाराचे दक्षिण भारत जैन सभा परिवाराच्यावतीने अत्यंत मन:पूर्वक धन्यवाद .सुनील पाटील हे civil eng असुन सौरभ कंस्टकशन नावाने civil कामे करतार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.