Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्रांनो करोना संबंधी थोडे माझे विचार...

मित्रांनो करोना संबंधी थोडे माझे विचार...


पुढे कायम जगात असेच होणार आहे आपल्याला विविध बांधनातच काम करावे लागणार आहे असे वाटते...

मास्क व सॅनिटीझरचा वापर करावा...

बाजारात काम असेल तरच जावा, किराणा व इतर खरेदीसाठी आठवड्यातील एकच दिवस जावा, मात्र औषधे त्यास अपवाद आहेत, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम टाळता येत असतील तर टाळा इतर मार्गाने शुभेच्छा दिल्या तरी चालतात..कोण काय म्हणेल याची काळजी नको. करोना झल्यावर फक्त मेसेजेस येतात कोणी भेटायला येत नाही हे लक्षात घ्या आणि त्याच्याही पुढे जाऊन कोणी करोनाने दगावलेच तर सरकार देखील नातेवाईकांना  अंत्यसंस्कार करायला परवानगी देत  नाही  हे ही ध्यानात ठेवावे. 

रात्रीच्या पार्ट्या व पर्यटन बंद करा... कांही महिने देवाला गेले नाही तरी चालेल घरातच नमस्कार किंवा पूजा अर्चा करावी. नंतर देवाकडेच जायचे आहे पण आत्ता अवेळी नको. अजून भरपूर जगायचे आहे..जे कांही करायचे ते घरीच करा किंवा जेथे गर्दी आणि अनोळखी लोक नाहीत अशा ठिकाणीच 🥃 'बसा' ....अन्यथा हा व्हायरस कधी आपल्यापर्यंत येईल ते सांगता येणार नाही...

सरकार काय फक्त निर्देश देईल आणि पोलीस थोडी कारवाई करतील पण नागरिकांनीच स्वतःची काळजी ही स्वतःच घेतली पाहिजे असे वाटते....

व्यापारी उद्योजकांनी देखील करोना संबंधीची काळजी घेणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे काउंटरवर शेकडो लोक येतात त्याचे नोयोजन देखील आवश्यक आहे. यामध्ये दुकाने सकाळी  ९ ते १२ आणि सायंकाळी ३ ते ६ किंवा ७ उघडी ठेवली तरी चालू शकेल असे वाटते. यामुळे बाजारात गर्दी होणार नाही..त्यामध्ये व्यवसाय देखील होईल आणि करोनाचे नियमही पाळले जातील. 

उद्योजकांनीही आपण काय काळजी घ्यावी लागते हे एकत्र बसून नियमावली करावी असे वाटते. त्यामध्ये उत्पादन वेळेचे नियोजन, एकआड एक दिवस सुट्टी घेऊ शकतो का ? कामाचे तास कमी करू शकतो का ? 

निदान हे दोन महिने जानेवारी व फेब्रुवारी तरी आपण पाळणे आवश्यक आहे असे वाटते..

सरकारनेही सर्व गोष्टी लक्षात घेऊन नियमावली करावी कारण व्यापारी उद्योजकांना काम बंद करा किंवा कमी करा हे सांगणे सोपे आहे पण बँकांचे व्याज थांबते का ? ते रविवारीही पडते..सरकारी कर्मचायांचे पगार व इतर सुविधा व्यवस्थित चालू असतात. अगदी लाईट बील भरण्यास थोडा जरी उशीर झाला तरी न विचार करता महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा खंडित करतात तेही कोणतीही नोटीस न देता. ही अन्यायकारक पद्धत सरकारने बंद करावी...नाहीतर उद्या या अशा प्रकारच्या कर्मचार्यांमुळे सरकार अडचणीत येईल...

मित्रांनो काळजी घ्यावी, सरकार फक्त नियम सांगते व कांही प्रमाणात कठोर वागते पण ते आपल्यासाठीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे...

आशिष शहा ( अध्यक्ष )

व्यापारी उद्योजक असोसिएशन ( सांगली जिल्हा)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.