Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे सरकारकडून निर्बंधात पुन्हा एकदा सुधारणा, राज्यातील दुकानांबाबत घेतला मोठा निर्णय..

 ठाकरे सरकारकडून निर्बंधात पुन्हा एकदा सुधारणा, राज्यातील दुकानांबाबत घेतला मोठा निर्णय..


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने 8 जानेवारी 2022 पासून राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, नंतर दोन दिवसांपूर्वी या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार ब्युटी पार्लर व जीममध्ये 50 टक्के क्षमतेने, मास्कचा उपयोग करुन व पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना सेवा देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. कोणतेही नवीन आदेश येईपर्यंत, हेच आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, ठाकरे सरकारने पुन्हा एकदा आपल्या निर्बंधांसंबंधी काढलेल्या आदेशात अंशत: सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार आता मुंबईसह राज्यात अत्यावश्यक नसलेली दुकाने रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तसा आदेश लागू करण्यात आला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात नवीन निर्बंधांत आता अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने आता रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार राज्यातील दुकाने रात्री 10 वाजता बंद करावी लागणार आहेत. ठाकरे सरकारने या आधी रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचा आदेश दिला आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील तरच सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करता येणार आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणं बंधनकारक असणार आहेत.

सुधारित आदेशानुसार ब्युटी सलूनचा समावेश 'केश कर्तनालय' (किंवा हेअर कटिंग सलून) या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवता येणार आहेत. सोबतच केश कर्तनालय/ हेअर कटिंग सलून करिता उल्लेखित निर्बंध लागू असतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशीच सेवा देण्यास मुभा असेल की, ज्यामध्ये मास्क काढण्याची गरज नसते. या सेवेचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे ब्युटी सलून मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल.

जिम अर्थात व्यायामशाळा हे क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत चालू ठेवता येतील, तथापि तिथे मास्क लावणे बंधनकारक असेल. या सेवेचा लाभ देखील केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल. त्याचप्रमाणे व्यायामशाळेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष मुखर्जी यांनी दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.