आजपासून संपूर्ण देशभरात दिला जाणार लशीचा बूस्टर डोस; जाणून घ्या महत्त्वाचे नियम
नवी दिल्ली 10 : कोरोनाच्या वाढत्या प्रसारादरम्यान आजपासून संपूर्ण देशभरात प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात होणार आहे.आज सकाळी 9 वाजेपासून प्रिकॉशन डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना दिला जाईल. हा प्रिकॉशन डोस त्याच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना देण्यात येणार आहे, ज्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे मृत्यूची नाही भीती!
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट केलं की एक कोटीहून अधिक फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोससाठी एसएमएस पाठवून आठवण करून दिली गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलेल्या अंदाजानुसार 1.05 कोटी आरोग्य कर्मचारी, 1.9 कोटी फ्रंटलाइन कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2.75 कोटी लोकांना या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक डोस दिले जातील. प्रिकॉशन डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं होतं की यासाठी नवीन नोंदणीची गरज नाही. यासाठी थेट अपॉइंटमेंट घेता येईल.
एवढंच नाही तर थेट लसीकरण केंद्रात जाऊनही लस घेता येऊ शकते. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि NITI आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी सांगितलं होतं की, प्रिकॉशन डोस किंवा बूस्टर डोस त्याच लसीचा असेल, ज्या लसीचे पहिले दोन डोस घेतले आहेत. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ज्यांना यापूर्वी कोविशील्ड लसीकरण करण्यात आलं आहे त्यांना कोविशील्डचाच बूस्टर डोस दिला जाईल. ज्यांनी यापूर्वी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे त्यांना कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस मिळेल. पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी कोरोनाचा गेम; ऑक्सिजन सपोर्टवर 24 तासांत 264 % रुग्ण आजपासून भारतात बूस्टर डोस सुरू होण्यापूर्वी, NIMA (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन), देशातील आयुष डॉक्टरांची संघटनांनी पंतप्रधान, आरोग्य मंत्री आणि कोविन प्रमुख यांना पत्र लिहून आयुष डॉक्टरांनाही बूस्टर डोस देण्याची मागणी केली आहे. .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.