Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रक्तदान, अन्नदान, लाडूतुला करून पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस साजरा सर्व थरांतून शुभेच्छांचा वर्षाव

रक्तदान, अन्नदान, लाडूतुला करून पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस साजरा सर्व थरांतून शुभेच्छांचा वर्षाव


सांगली, दि. ३१: काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्व थरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

पृथ्वीराज पाटील दिवसभर त्यांच्या वसंत कॉलनी येथील निवासस्थानी उपस्थित होते. शाळेत शिकणा-या होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवूया या संकल्पनेतून, त्यांनी सर्वांना आवाहन केले होते त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे हार, तुरे, पुष्पगुच्छ अशा शुभेच्छा न स्विकारता वह्या रूपी लोकांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांसाठी त्यांच्या निवासस्थानी लोक दिवसभर येत होते. राज्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.

सकाळी निवासस्थानी माजी नगरसेवक सच्चीदानंद कदम व पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीनेत्यांची लाडूतुला करण्यात आली. कार्यकर्त्यांनी विविध भागात जाऊन गोरगरीब लोकांना, मजुरांना लाडू वाटप केले. 

पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने आदल्या दिवशी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या काळात सामाजिक बांधीलकी म्हणून रात्री रस्त्यावर झोपलेल्या बेघर, अनाथ लोकांना ब्लँकेट, चादरीचे वाटप करण्यात आले.  त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात रक्तदानाची कमतरता पाहून रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 57 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात हीरीरीने सहभाग घेतला. 

कुपवाड, दत्तनगर येथे प्रभाततारा अनाथ आश्रमामध्ये प्रशांत देशमुख, अशोक रास्कर, महावीर खोत, प्रकाश घुटुगडे, रुपेश मोकाशी, समीर मुजावर, अमोल कदम,महेश लांडगे, विठ्ठल संकपाळ, विशाल सरगर, शरीफ शेख, श्रीकृष्ण कोकरे यांच्या वतीने फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

मदरसा दारूल उलूम, शामरावनगर, सांगली येथे अल्पसंख्यांक विधानसभा क्षेत्राध्यक्ष, ताजुदृदीन शेख यांच्या वतीने येथील मुलांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी मोहसिन शिकलगार, गौतम निरंजन, कैस शेख, हाफिज गुलाब, हाफिज सलमान, गुलाबराव खराडे, समिर जमादार, जहांगिर जमादार सहभागी होते.

श्री गणेश मार्केट गाळेधारक व्यापारी असोसिएशन सांगली यांच्या वतीने पीपल फॉर ऍनिमल संस्थेत जाऊन पशुपक्ष्यांना केळी, दूध, तांदूळ, चारा वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष गणेश कोडते, आदित्यराज घोरपडे, अक्षय सातपुते, प्रदीप शिंदे , प्रकाश संकपाळ, संभाजीराव कारंडे, निरंजन यादव यांनी केले होते.

मिरज येथे गरीब बेघर लोकांना, उसतोड मजूर बांधवांना मा. बाबांच्या वाढदिवसानिमित्त पोटभर जेवन मिळावे या उद्देशाने युसूफ भाई निशाणदार मित्र मंडळ, मिरज यांच्या वतीने जेवनाचे किट वाटप करण्यात आले.  यावेळी आयूब निशाणदार, गणपती चौगुले, आसिफ घारले, सलीम शेख, आलम सनदी, अमीर शहापुरे, रेशब चांदणे, आसिफ निशाणदार सहभागी होते

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयातील व शाळा यांच्या वतीने बाबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने संस्थेत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  यावेळी गुलाबराव पाटील हॉस्पीटलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोफत आरोग्य शिबीरही घेण्यात आले.

यावेळी मा. पृथ्वीराज बाबा यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे पुढील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

मा. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, आ. जयंत आसगांवकर, खासदार संजयकाका पाटील,  इस्लामपूरचे नगराध्यक्ष, निशिकांतदादा पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक विशालदादा पाटील, महेंद्र आप्पा लाड, अनिताताई सगरे, सत्यजीत देशमुख, मनोजबाबा शिंदे, डी. के. काका पाटील, दीपकबाबा शिंदे - म्हैसाळकर, सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे, राष्टवादी जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, ओबीसी सेलचे भानुदास माळी, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, उपाध्यक्ष रमेश साबळे, डॉ. रमेश लाका, मा. आ. काकासाहेब पाटील, मा. आ. नितीन शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष, शेखर इनामदार, निताताई केळकर, भारती विद्यापीठचे हणमंतराव कदम, जितेश कदम, होमिओपॅथिक असोसिएशनचे राष्टीय अध्यक्ष, डॉ. रामजीसिंग, रावसाहेब जिनगोंडा पाटील, उपमहापौर, उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, माजी सभापती, सुरेश आवटी,  नगरसेवक वैभव पवार, विष्णू माने, मंगेश चव्हाण, अभिजीत भोसले, संतोष पाटील, राजेंद्र कुंभार, संजय कांबळे, पांडूरंग कोरे, मनगू सरगर, माजी महापौर संगिता खोत, वहिदाभाभी नायकवडी, शुभांगी साळुंखे, आरती वळवडे, कल्पना कोळेकर, वैभव पाटील, विटा, रविंद्र भिंगारदिवे, बाळासाहेब गुरव, जितेंद्र पाटील, प. स. उपसभापती अनिल आमटवणे, मा. सभापती भाउसाहेब पाटील, मार्केट कमिटी संचालक जीवन पाटील, शिवसेनेचे नितीन काळे, पुढारीचे मदन पाटील, चिंतामणी सहस्त्रबुध्दे, लोकमतचे श्रीनिवास नागे, गृह विभागाचे सचिव युवाराज अजेटराव, प. स. सदस्य विक्रम पाटील, माजी नगराध्यक्ष, ए. जी. नदाफ, विराज शिंदे, अभिजित चव्हाण, संजय हजारे, मजूर सोसायटी जिल्हा अध्यक्ष, सुनिल ताटे, महाराष्ट होमिओपॅथि परिषदेचे प्रशासक, डॉ. गोसावी, रजिस्टार कैलास सोनमनकर, समिर बिरनाळे, माजी अधिष्ठाता डॉ. बोराडे, नंदु गुरव, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, चंदन चव्हाण, विजय बेलवलकर, विठ्ठल तात्या खोत, रहिमान शिकलगार, उद्योजक भालचंद्र पाटील, बाळासाहेब मंगसुळे, अजित शिरगावकर, जयदिप कदम, तहसिलदार शरद पाटील, शशिकांत पवार, अनेक उद्योजक, व्यापारी, शिक्षण क्षेत्रातील लोक, सामान्य नागरिक, पत्रकार यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.