जिओची आता सर्व रिचार्ज होतील आपोआप फक्त हे करावे लागणार
पुणे - मोबाईल वापरामुळे दैनंदिन जीवनात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होत असतानाच त्यासाठी काही वेळा अडचणीचा देखील सामना करावा लागतो.
मोबाईलचा वापर करत असताना ग्राहकांना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे वारंवार रिचार्ज करावे लागणे. रिचार्ज करण्यासाठी जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यासारख्या खासगी टेलिकॉम कंपन्या तसेच बीएसएनएल शासकीय कंपनी असताना देखील नेमके कोणते रिचार्ज करावे असा प्रश्न ग्राहकांना निर्माण होतो. परंतु आता जिओ ग्राहकांसाठी सहज सुलभपणे रिचार्ज होईल, अशी योजना तथा प्लॅन आणला आहे, याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होऊ शकतो.
नवीन उत्तम फीचर
जिओ ग्राहकांना पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचा टेन्शन दूर करण्यासाठी कंपनीने एक नवीन उत्तम फीचर आणले आहे. मोबाईल रिचार्जची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, रिलायन्स जिओ आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI ऑटोपेची घोषणा केली आहे. आता करोडो जिओ वापरकर्ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वयंचलित रिचार्जसाठी UPI ऑटोपेचा लाभ घेऊ शकतील.
पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी
या सुविधेद्वारे, जिओ वापरकर्ते MyJio अॅपवर UPI ऑटोपे वापरून त्यांच्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी ऑर्डर सेट करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा मोबाईल रिचार्ज करण्याची काळजी करण्याची गरज नाही. रिलायन्स जिओ ही ग्राहकांसाठी अशी सेवा सुरू करणारी भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे.
ही सुविधा आली
आता जिओ वापरकर्त्यांना त्यांचा विद्यमान प्लॅन कालबाह्य होण्याची आणि ते रिचार्ज करण्याची चिंता करण्याची गरज नाही. UPI ऑटोपे सह, मोबाईल वापरकर्ते रिचार्ज प्रक्रिया ऑटो (स्वयंचलित ) करू शकतात. असे केल्याने, सध्याच्या योजना कालबाह्य होताच त्यांचा मोबाइल नंबर आधीच निवडलेल्या प्लॅनमध्ये आपोआप रिचार्ज होईल.
कधीही बदला
वापरकर्ता ग्राहक कधीही सेटिंग बदलू शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना 5,000 रुपयांपर्यंतच्या रिचार्ज व्यवहारांसाठी त्यांचा UPI पिन टाकण्याचीही गरज नाही. तसेच वापरकर्ते वेळ व सेटिंग्ज बदलू शकतात आणि ऑटो-रिचार्ज बंद करू शकतात किंवा भविष्यात त्यांना रिचार्ज करू इच्छित असलेला प्लॅन बदलू शकतात.
ऑटोपे
Jio वापरकर्त्यांना UPI ऑटोपे द्वारे त्यांच्या गरजेनुसार टॅरिफ प्लॅनसाठी ई-आदेश काढून टाकण्याचा पर्याय देखील असेल. तसेच हे फीचर अनेकांसाठी खूप उपयुक्त ठरेल, कारण याद्वारे ते त्यांच्या पालकांचे आणि मुलांचे मोबाईल नंबर कोणत्याही त्रासाशिवाय रिचार्ज करू शकतील. मोबाईल रिचार्ज कधी संपत आहे यावर यूजर्सना लक्ष ठेवावे लागणार नाही. ते फक्त UPI ऑटोपे सेट करू शकतात आणि Reliance Jio सह मोबाइल सेवा अनुभवाचा आनंद घेऊ शकतात.
केवळ प्रीपेडसाठी
जिओ कंपनीची ही सेवा फक्त कंपनीच्या प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांसाठी आहे. तसेच सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांना मॅन्युअली रिचार्ज करत राहावे लागेल. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह इतर खासगी दूरसंस्था देखील आता अशीच सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.