Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी, अजित पवार म्हणाले.

 कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी, अजित पवार म्हणाले.


कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलीय.

आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार आहे. आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत. 1818 साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा धोका वेगाने वाढतोय . चार दिवसांच्या अधिवेशनात दहा मंत्री आणि वीसहून अधिक आमदार कोरोना बाधित झालेत, असंही त्यांनी सांगितलं.

बैलगाडा शर्यत काल रात्री रद्द करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही याची माहिती घ्यावी, असंही ते म्हणाले. राज्य कोरोना मुक्त करणे हा नवीन वर्षाचा संकल्प असेल. कोरेगाव- भीमा आणि वढू- तुळापूर इथले स्मारक या वर्षात उभारण्याचा संकल्प आहे, असंही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.