Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दररोज 95 रुपये जमा करा आणि 14 लाख मिळवा

 दररोज 95 रुपये जमा करा आणि 14 लाख मिळवा


पोस्ट ऑफिसमध्ये अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवर ग्राहकांचा विश्वासही आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षितत असून वेळेत योग्य तो रिटर्न देतात.

यापैकीच एक योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही दररोज 95 रुपये गुंतवू शकता आणि मैच्योरिटीच्या वेळी सुमारे 14 लाख रुपये मिळवू शकता. नावाप्रमाणेच, ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना ही ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या  वेबसाइटनुसार, ही योजना मनी बॅक पॉलिसी आहे.

पोस्ट ऑफिसच्या मते, ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी सर्वात फायदेशीर आहे ज्यांना वेळेत रिटर्नची आवश्यक आहे. पॉलिसी अंतर्गत विमा कंपनीला वेळोवेळी सर्व्हायव्हल बेनिफिट देखील दिला जातो. विमाधारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास, बोनससह संपूर्ण विमा रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाकडे दिली जाते.ग्राम सुमंगल योजनेसाठी वयोमर्यादा

ग्राम सुमंगल योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय 19 वर्षे आहे. पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये प्रवेशाचे कमाल वय 20 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी 40 वर्षे आणि 15 वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे आहे ठेवण्यात आले आहे.

मॅच्युरिटीवर बोनसचा लाभ

ग्राम सुमंगल योजनेत, गुंतवणूकदाराला पैसे परतीचा लाभ मिळतो, जो तीनदा दिला जातो. 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षे, नऊ वर्षे आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर 20 टक्के रक्कम परत मिळते. यानंतर, मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कम देखील गुंतवणूकदारांना प्रदान केली जाते.

दररोज 95 रुपये गुंतवून 14 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर गुंतवणूकदार 25 वर्षांचा असेल आणि 7 लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह 20 वर्षांसाठी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असेल तर मासिक हप्ता 2853 रुपये किंवा सुमारे 95 रुपये प्रतिदिन असेल. या योजनेत वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये असेल.या योजनेनुसार गुंतवणूकदाराला 8व्या, 12व्या आणि 16व्या वर्षी 1.4 लाख रुपये मिळतील. 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला 2.8 लाख रुपयांच्या वीमा रकमेचा लाभ आणि 48 रुपये प्रति हजार वार्षिक बोनस मिळेल. 20 वर्षांच्या कालावधीत एकूण बोनस 6.72 लाख रुपये असेल. सर्व हप्ते आणि बोनस जोडल्यास, गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी एकूण 13.72 लाख रुपये मिळतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.