Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये

 पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये


नवी दिल्ली :  छोट्या ठेवीवर ही मोठा परतावा मिळू शकतो. आज बाजारात अनेक योजना चालू आहेत, त्यामुळे योग्य निवड करणे कठीण झाले आहे.

सरकारमान्य योजना सामान्यतः ग्राहकांना आकर्षित करतात. इंडिया पोस्टने ऑफर केलेल्या बचत योजना देखील लोकांच्या पसंतीस उतरतात. इंडिया पोस्टने  सुरू केलेली अशीच एक योजना पोस्ट ऑफिस  रेकरिंग डिपॉजिट खाते आहे. या योजनेतील व्याजदर तीन महिन्यांत समन्वित करण्यात आले आहे, या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या मुलाच्या नावावर खाते उघडण्याचे स्वातंत्र्य आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षित आर्थिक भविष्याची हमी मिळेल.

एका ग्राहकाला त्यांच्या मुलाच्या नावावर खाते उघडण्यासाठी, त्यांचे कायदेशीर पालक म्हणून लिस्टेड केले पाहिजे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे.

या योजनेचे उत्पन्न काय आहे:

कोणतेही पालक आपल्या मुलासाठी RD खाते  खोलू शकतात. ते दररोज 70 रुपयाची गुंतवणूक करू शकतात, त्यामुळे त्याचे दरमहा 2,100 रुपये होतील. मॅच्युरिटीवर म्हणजेच 5 वर्षांच्या शेवटी, पालकांच्या खात्यात 1,26,000 रुपये असतील. तसेच याबरोबर व्याज दरहि विचारात घेतला जातो जो त्रेमासिक चक्रवाढ असतो. एप्रिल 2020 पासून RD खातेधारकाला 5.8% व्याजदर दिला जात आहे. यामुळे 5 वर्षांच्या शेवटी 20,000 रुपये व्याज मिळते. अशा प्रकारे, खातेधारकाच्या RD खात्यातील रक्कम 1,46,000 रुपये एवढी होईल.

RD खाते उघडण्यापूर्वी इतर गोष्टी जाणून घ्या.

पात्रता: ही योजना कोणत्याही भारतीय नागरिकांना जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्तींसाठी सिंगल किंवा संयुक्त खाते उघडण्याची परवानगी देते.

एक पालक देखील अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. तसेच 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल देखील आपले खाते उघडू शकते.

काय मर्यादा आहेत : इंडिया पोस्ट वेबसाइटनुसार मासिक ठेवीची किमान रक्कम केवळ 100 रुपये आहे, यामध्ये कोणतीही कमाल मर्यादा नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.