Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महानगरपालिका क्षेत्रात 5072 जणांनी घेतला बूस्टर डोस तर 15 ते 18 वयोगटातील 26011 लाभार्थ्यांनी घेतली लस : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती

सांगली महानगरपालिका क्षेत्रात 5072 जणांनी घेतला बूस्टर डोस तर 15 ते 18 वयोगटातील 26011 लाभार्थ्यांनी घेतली लस : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 22 जानेवारी 2022 अखेर 5072 जणांनी आपला तिसरा प्रिकॉशन बूस्टर डोस घेतला आहे तर 15 ते 18 वयोगटातील 26011 लाभार्थ्यांनी आपला डोस घेतला आहे. तसेच आजअखेर 679475 नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. अशी माहिती मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

     आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटाच्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मागील 19 दिवसात 15 ते 18 वयोगटातील 26011 इतक्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.  यासाठी महापालिकेचे 19 आरोग्य केंद्र आणि काही शाळांमध्ये जाऊन सुद्धा महापालिकेच्या टीमने लसीकरण करून घेतले आहे. याचबरोबर 10 जानेवारी पासून प्रिकॉशन (बूस्टर) डोस देण्याची प्रक्रिया सुद्धा 19 केंद्रावर सुरू आहे. 22 जानेवारी 2022 पर्यंत 12 दिवसात 5072 इतक्या पात्र लाभार्थ्यांनी आपला प्रिकॉशन (बूस्टर) डोस घेतला आहे. यापुढेही ज्यांचा दुसरा डोस पूर्ण होऊन 9 महिने झाले आहेत अशा लाभार्थ्यांना बूस्टर देण्यात येणार आहे. 

 महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 6 लाख 79 हजार 475 इतक्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही आपला पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन घ्यावा आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट उद्भवू नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून त्रिसूत्रीचे सुद्धा पालन करावे असे  आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.