Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 44 हजार 540 नविन नाव नोंदणी

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यात 44 हजार 540 नविन नाव नोंदणी


सांगली, दि. 20, : भारत निवडणूक आयोग, प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशानुसार दि. 25 जानेवारी 2022 हा दिवस 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दि. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा असल्याने जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार व नव युवक / युवती मतदारांनी आपल्या रहिवाशी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  दि. 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत पार पडला असून अंतिम मतदार यादी दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये 44 हजार 540 नविन नाव नोंदणी झाली असून 18 ते 19 वर्षाच्या 21 हजार 970 मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच मतदार यादीतील  मयत, दुबार व कायमस्वरूपी स्थलांतरीत अशा 5 हजार 947 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीत पुरूष 12 लाख 49 हजार 121, स्त्रीया 11 लाख 73 हजार 672 व तृतीयपंथी 93 असे एकूण 24 लाख 22 हजार 886 मतदार आहेत.

मतदार यादीत आपले नाव असल्याची ceo.maharashtra.gov.in व  sangli.nic.in  या संकेतस्थळावर मतदार खात्री करू शकतात. ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत परंतू अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविले नाही अशा नागरिकांनी निरंतर प्रक्रियेमध्ये आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नं. 6 चा अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयात व 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे सादर करावा. नविन नोंदणी झालेल्या मतदारांनी त्यांच्या मोबाईलमध्ये e-EPIC डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.