Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चौगुले इंडस्ट्रिज प्रा. ली. व पोलीस कल्याण योजने अंतर्गत 26 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पार पडला

चौगुले इंडस्ट्रिज प्रा. ली. व पोलीस कल्याण योजने अंतर्गत 26 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पार पडला 


चौगुले इंडस्ट्रिज प्रा. ली. व पोलीस कल्याण योजने अंतर्गत पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांसाठी राबविलेल्या  147 कारचे बुकिंग झालेल्या पैकी 106 मारुती सुझुकी कारच्या चावी प्रदान सोहळा 26 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पार पडला 

मारुती सुझुकी सोबत अखंड व अविरत 36 वर्षें असणाऱ्या चौगुले इंडस्ट्रीज प्रा. ली. व पोलिस कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खास पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गा साठी राबविण्यात आलेल्या या योजनेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. 

या योजने अंतर्गत सांगली जिल्हा पोलिस दलासाठी विशेष सवलत, कमीत कमी व्याज दर, व अधिक रकमेची कर्ज योजना , तसेच पोलीस मारुती कार ग्राहकांना वर्कशॉप कामावरील मजुरी वरती 20% खास सवलत, मारुती जेन्यूईन ऍक्सेसरीज वर 15% विशेष सूट ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

सन 2001 पासून सांगली जिल्यात कार्यरत असणाऱ्या चौगुले इंडस्ट्रीज प्रा. ली चे जिल्हाभर 7 ठिकाणी आरीना , नेक्सा , कमर्शियल, ट्रू व्हॅल्यू, या श्रेणीतील 48000 समाधानी ग्राहकांसाठी कार विक्री व विक्री पश्चात सेवा देणारे पश्चिम महाराष्ट्रातील असे एकमेव सुसज्ज व अद्यावत  शोरूम व वर्कशॉप.

26 जानेवारी 2022 रोजी चावी प्रदान  सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच सांगली जिल्हयाचे पालकमंत्री ना. मा. जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे

 1) श्री अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली जिल्हा.

2) श्री दीक्षित गेडाम साहेब, सांगली जिल्हा पोलिस प्रमुख

3) श्री जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

4) श्रीमती मनीषा दुबुले ,अप्पर पोलीस अधीक्षक सांगली

 5)श्री नितिन कापडणीस, आयुक्त, सा. मि. कु. महानगरपालिका

व चौगुले इंडस्ट्रीज प्रा. ली तर्फे

6) श्री सुभाष उदगावे, जनरल मॅनेजर, सर्व्हीस

7) श्री आप्पासाहेब कोष्टी, जनरल मॅनेजर , अकौंटस व इन्शुरन्स

आदी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.