जिल्ह्यात सप्टेंबर 2020 ते मार्च 2021 कालावधीत
मुद्रांक शुल्कात 65 कोटी 29 लाखाहून अधिक सूट
सांगली, दि. ६ : महाराष्ट्र शासन अधिसूचना व शासन निर्णयान्वये स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीकरापत्राच्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्क आणि जिल्हा परिषद अधिभार यासह दि. 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये 3 टक्के तर दि. 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये 2 टक्के सवलत जाहीर केली होती. सांगली जिल्ह्यात दि. 1 सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये 28 हजार 382 नोंदणीकृत झालेल्या दस्तऐवजांमध्ये 78 कोटी 41 लाख 71 हजार 975 रूपये इतका मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आला. तर 65 कोटी 29 लाख 26 हजार 23 रूपये मुद्रांक शुल्क (जिल्हा परिषद अधिभार सहीत) सूट देण्यात आली.
महिना निहाय नोंदणीकृत झालेले एकूण दस्तऐवज, वसूल केलेला मुद्रांक शुल्क व कंसात जिल्हा परिषद अधिभार सहीत सुट दिलेला मुद्रांक शुल्क अनुक्रमे पुढीलप्रमाणे. सप्टेंबर 2020 - 2667, 8 कोटी 90 लाख 95 हजार 330 रूपये (11 कोटी 45 लाख 74 हजार 944 रूपये). ऑक्टोबर 2020 - 3906, 8 कोटी 70 लाख 77 हजार 520 रूपये (8 कोटी 82 लाख 27 हजार 280 रूपये). नोव्हेंबर 2020 - 3469, 8 कोटी 5 लाख 23 हजार 710 रूपये (8 कोटी 93 लाख 83 हजार 808 रूपये). डिसेंबर 2020 - 6080, 15 कोटी 36 लाख 41 हजार 580 रूपये (17 कोटी 44 लाख 56 हजार 279 रूपये). जानेवारी 2021 - 3676, 10 कोटी 31 लाख 30 हजार 985 रूपये ( 6 कोटी 7 लाख 13 हजार 255 रूपये). फेब्रुवारी 2021 - 3512, 10 कोटी 5 लाख 30 हजार 245 रूपये (4 कोटी 36 लाख 40 हजार 652 रूपये). मार्च 2021 - 5072, 17 कोटी 01 लाख 72 हजार 605 रूपये (8 कोटी 19 लाख 29 हजार 805 रूपये).
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.