Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 22,  : राज्य शासनाकडील दि. २० जानेवारी २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे अगर बंद ठेवण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत व कोविड पॉझीटीव्हीटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने व वेगाने होणारी वाढ पाहता कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी काही बाबी वगळता सांगली जिल्ह्यात इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळा दि. 31 जानेवारी 2022 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. 

तथापि गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 च्या RTPCR व RAT तपासणीचा पॉझीटीव्हीटी दर    स्थिर आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी एक फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या  सर्व शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना covid-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. शाळा सुरु करत असताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ( दोन्ही मात्रा) झालेले असणे बंधनकारक आहे. याबरोबरच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत . सर्व शिक्षण अधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.दि 1 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे .

शाळा सुरू करत असताना शासनाने वेळोवेळी संदर्भातील परीपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.