Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा

 वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा


ठाणे : मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाइल  तयार करुन अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे.

आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून ‘लखोबा लोखंडे’ अनेक महिलांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भामट्याने जवळपास 15 महिलांना गंडवल्याचा आरोप केला जात आहे. आधीच लग्न झालेलं असताना देखील आरोपीने मॅट्रिमोनियल साईट्सवर नाव नोंदवलं आणि भोळ्या भाबड्या महिलांना टार्गेट केल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने या सर्व महिलांकडून मिळून एकूण एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उकळल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विवाहोच्छुक महिलांना लग्नाच्या बेडीत अडकवण्याची खोटी स्वप्न दाखवणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी खऱ्याखुऱ्या बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

लग्नासाठी उत्सुक असलेल्या अनेक मुली आणि महिला मनाजोगता नवरा मिळावा, यासाठी अनेकदा मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर आपले नाव नोंदवून माहिती पुरवतात. परंतु याचाच फायदा घेत त्यांच्याकडून बक्कळ पैसे उकळणाऱ्या एका ठगा विरोधात कल्याण येथे गुन्हा नोंद झाला होता.

विवाहित तरुणाकडून महिलांची फसवणूक

पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत म्हात्रे नावाच्या भामट्याला रायगडमधील उरण येथून अटक केली. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर या ठगाने आपला हा धंदा सुरु केला. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून त्याने महिलांची फसवणूक केली.

15 महिलांकडून एक कोटी उकळले

जवळपास 15 महिलांकडून तब्बल एक कोटी रुपये उकळल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. मॅट्रिमोनियल साईट्सवर वरसंशोधन करतांना महिलांनी अत्यंत सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.