महापालिकेच्या 15 ते 18 वयोगटातील लसीकरनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : 569 पात्र लाभार्थ्यांनी घेतली कोविडची लस: उद्यापासून महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जाणार :
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेका क्षेत्रात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरनाला सुरवात झाली. सोमवारी पहिल्याच दिवशी या वयोगटातील 569 इतक्या लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले . त्यामुळे हा प्रतिसाद पाहता उद्या मंगळवार पासून महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रावर 15 ते 18 वयोगाचे लसीकरण सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार सोमवारपासून महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थी संख्या ही 20 हजाराचा आसपास आहे. यासाठी सांगलीतील जामवाडी, हनुमाननगर, साखर कारखाना तर मिरज इंदिरानगर आणि मिरज अर्बन या पाच आरोग्य केंद्रात पहिल्या दिवशी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. सोमवारी पहिल्याच दिवशी या पाच केंद्रावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी पाच आरोग्यकेंद्रावर 569 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. हा प्रतिसाद पाहता मंगळवार पासून महापालिकेच्या उर्वरित सर्वच आरोग्य केंद्रावर 15 ते 18 या वयोगटातील लाभार्थी असणाऱ्या विद्यार्थी आणि युवा वर्गाचे लसीकरण करण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेशही आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. शिवाय शाळा आणि शिक्षण संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.