Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारत सूतगिरणी ते कुपवाड जकात नाका या महत्त्वाच्या रस्त्याचे हॉटमिक्स काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण 1200 मीटर कामामध्ये 2 टन प्लास्टिकचा वापर

 भारत सूतगिरणी ते कुपवाड जकात नाका या महत्त्वाच्या रस्त्याचे हॉटमिक्स काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण 1200 मीटर कामामध्ये 2 टन प्लास्टिकचा वापर : आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार होत आहेत दर्जेदार रस्ते:


सांगली: भारत सूतगिरणी ते कुपवाड जकात नाका या महत्त्वाच्या रस्त्याचे हॉटमिक्स काम अंतिम टप्प्यात आले आहे. आझादीका अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अंतर्गत एकूण 1200 मीटर कामामध्ये 2 टन प्लास्टिकचा वापर करण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर करून रस्ते करण्याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपाक्षेत्रात दर्जेदार रस्ते होत आहेत. हा चौथा मुख्य रस्ता प्लाटिकयुक्त पूर्ण होत आहे.


    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महत्वाच्या मुख्य रस्त्यांच्या हॉटमिक्सची कामे सुरू आहेत. हॉटमिक्स रस्त्याची कामे करत असताना ती अधिक काळ टीकावीत आणि दर्जेदार रस्ते व्हावेत या उद्देशाने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहर अभियंता संजय देसाई यांना हॉटमिक्स रस्ते कामासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉटमिक्स मालामध्ये प्लास्टिकचा वापर करून त्याचे मिश्रण असणारे हॉटमिक्स वापरून रस्त्याची कामे करावीत असे आदेश दिले होते. यानुसार तिन्ही शहरात प्लास्टिकयुक्त हॉटमिक्स रस्ते बनवले जात आहेत. भारत सूतगिरणी ते कुपवाड जकात नाका या संपूर्ण रस्त्याचे काम योग्य रीतीने सुरू आहे. या रस्त्यासाठी 2 टन प्लाटिकचा वापर केला जात असून यामुळे हा रस्ता दर्जेदार बनणार आहे. या रस्ते कामाची पाहणी शहर अभियंता संजय देसाई यांनी करत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी कनिष्ठ अभियंता अशोक कुंभार उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.