Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Omicron पासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी सांगितले सहा सोपे उपाय, तुम्हीही लक्षात ठेवा

 Omicron पासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी सांगितले सहा सोपे उपाय, तुम्हीही लक्षात ठेवा


मुंबई : जगातील 20 हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार पोहोचला आहे. या प्रकाराचं नाव Omicron असल्याचे सांगिकले जात आहे. जो कारोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोक्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे यापासून कसे वाचायचे आणि त्यासाठी काय काय उपाय करायचे? यासाठी लोकं माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. हा व्हेरिएंट दक्षिण अफ्रिकेतील असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे व्हेरियंटमध्ये आतापर्यंत अनेक म्युटेशन आढळले आहे.

त्यातच आता भारतातही चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असल्याने देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

यादरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे शास्त्रज्ञ अँथनी फौसी यांनी ओमिक्रॉन प्रकारांपासून संरक्षण करण्याचे 6 सोपे मार्ग सांगितले आहेत. चला जाणून घेऊया कोणते सात मार्ग, ज्याच्या मदतीने तुम्ही ओमिक्रॉन प्रकारांपासून स्वत:चं संरक्षण करू शकता.

1. कोविड लस घ्या- कोरोनाची दोन्ही ही लस लावून घ्या. ज्यामुळे याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2. मास्कचा वापर करा - मास्कचा वापर करणे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे आणि त्याचे सगळ्यांनी पालन करा, ज्यामुळे आपण या रोगाला हरवू शकतो.

3. गर्दीपासून लांब राहा- शक्यतो गर्दीत जाणं टाळा, गरज असेल तरच गर्दीच्या ठिकाणी जा, कारण यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.

4. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा

5. संक्रमाणाची लक्षणे दिसल्यास कोरोना टेस्ट करुन घ्या - टेस्ट केल्यामुळे तुम्हा लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू करता येईल, तसेच हा लोकांमध्ये पसरणार देखील नाही.

6. कोविडची लक्षणे आढल्यास स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.