Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज जागतिक एड्स दिन, HIV व्हायरसबद्दलचे गैरसमज काय?

 आज जागतिक एड्स दिन, HIV व्हायरसबद्दलचे गैरसमज काय?



World AIDS Day 2021 : जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे  साजरा करण्यात येतो.

एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो.

एचआयव्ही एक व्हायरस आहे. हा व्हायरस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करुन त्या पेशी नष्ट करतो. यामुळे व्यक्तीचं शरीर सामान्य आजारांचाही सामना करु शकत नाही. तसेच जर योग्य वेळी एचआयव्हीवर उपचार घेतले नाहीत तर हा आजार आणखी गंभीर होत जातो आणि एड्सचं कारण ठरतो.

एचआयव्ही आणि एड्समध्ये फरक काय?

एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. हा थेट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या टी सेल्सवर हल्ला करतो. तर एड्स  एक मेडिकल सिंड्रोम आहे. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर सिंड्रोम बनतो. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. परंतु, एड्सचा संसर्ग होत नाही.


असा पसरु शकतो एचआयव्ही?

एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.

एचआयव्हीपासून बचाव कसा कराल?

एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.

एचआयव्हीबाबत असलेले गैरसमज

एचआयव्हीबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. मच्छर चावल्याने, एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने, एकत्र जेवण केल्याने, संसर्ग झालेल्या व्यक्तीशी बोलल्याने किंवा एकच शौचालयाचा वापर अनेक लोकांनी केल्यामुळे एचआयव्ही होतो. पण हा निव्वळ गैरसमज आहे.

1988 पासून साजरा केला जातो एड्स डे

जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.