Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्न पदार्थ हाताळणी करणाऱ्या व्यक्तींना FOSTAC प्रशिक्षण

 अन्न पदार्थ हाताळणी करणाऱ्या व्यक्तींना FOSTAC प्रशिक्षण

सांगली, दि. 24, : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2015 अंतर्गत अन्न पदार्थ हाताळणी करणाऱ्या व्यक्तींना FOSTAC प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु.आ. चौगुले यांनी दिली.

FOSTAC प्रशिक्षणाची पहिली बॅच दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली. या बॅचला 100 अन्न पदार्थ हाताळणी करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांनी मान्यता दिलेले Farm to Fork Solution या संस्थेच्या ट्रेनर प्रियांका सूर्यवंशी व सांगली येथील समन्वयक दिक्षा शेट्टी उपस्थित होत्या. ट्रेनर प्रियांका सूर्यवंशी यांनी अन्न पदार्थ हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण स्लाईडव्दारे दाखवून माहिती सांगितली. 

या प्रशिक्षणामध्ये हॉटेल, केटरिंग, भाजी व फळ विक्रेते, रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणारे यांचे प्रतिनिधी हजर होते. या प्रशिक्षणास हजर असलेल्या प्रशिक्षणार्थीना FSSAI प्रमाणपत्र मिळणार आहे. 

या प्रशिक्षणास सहायक आयुक्त (अन्न सु.आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कोळी, श्रीमती फावडे, श्रीमती हिरेमठ, श्री. स्वामी व श्री केदार उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.