Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र कोरोना निर्बंध : मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत काय ठरलं?

 महाराष्ट्र कोरोना निर्बंध : मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत काय ठरलं?


भारतात ओमिक्रॉनमुळे संभाव्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी (23 डिसेंबर) कोव्हिड टास्कफोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा केली.

मुंबईत 20 डिसेंबरला 200 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती.23 डिसेंबरपर्यंत का आकडा वाढून 600 वर पोहोचलाय. तर महाराष्ट्रातही 48 दिवसांनंतर हजारावर नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

नवीन वर्ष, ख्रिसमस आणि सुट्टी यामुळे कोरोनासंसर्ग मोठ्याप्रमाणावर पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने काही निर्बंध घालण्याचा विचार सुरू केलाय.

काय असू शकतात निर्बंध?

मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत आज 24 डिसेंबरला कोरोना संदर्भातल्या निर्बंधाची नवी नियमावली जाहीर करण्याचं ठरलं आहे. हे निर्बंध पुढीलप्रमाणे असू शकतात.

गर्दी होण्याची ठिकाणं उदाहरणार्थ बीच किंवा मरिन डृाइव्ह सारख्या ठिकाणी रात्री फिरण्यावर निर्बंध येऊ शकतात.


हॉटेल, बारमध्ये गर्दी होऊ नये यासाठी यांच्या वेळेवर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे.

हॉटेल आणि बारच्या क्षमतेनुसार किती लोकांना परवानगी देण्यात येईल याबाबत सरकार निर्णय देऊ शकतं .

मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाही.

नवीन वर्ष आणि ख्रिसमस पार्टीतील लोकांच्या संख्येवर निर्बंध शक्य आहेत.

सोसायटीत टेरेस किंवा मोकळ्या जागेत पार्टीची परवानगी मिळणार नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी याबाबत घोषणा करू शकतात. त्यामुळे या निर्बंधाबाबत कोणी बोलण्यास तयार नाहीये. टास्कफोर्सचे सदस्य सांगतात, "सद्यस्थितीत सर्व बंद करण्याची गरज नाही. आपल्याकडे ओमिक्रॉनचे रुग्ण कमी आहेत. पण अर्थव्यवस्थेला चालना देताना गर्दी करून चालणार नाही. त्यावर लक्ष दिलं पाहिजे."

काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर बसवून पार्टी आयोजित करण्यात आली होती. केंद्राने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती पहाता राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याची सूचना केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोरोना संकटावर गांभीर्याने विचार केला जातोय. पंतप्रधान यावर लक्ष ठेऊन आहेत. रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळींवर सुरू झालीये." एकीकडे सरकार निर्बंध घालण्याची तयार करतंय. तर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी निर्बंध घालते आहेत.


मुंबईतील निर्बंध

200 पेक्षा जास्त लोक हॉटेल किंवा कोणत्या ठिकाणी एकत्र येणार असतील तर सहाय्यक आयुक्तांची परवानगी आवश्यक

बंद ठिकाणी पार्टी, लग्न, गेटटूगेदर, कार्यक्रम यासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी

मोकळ्या जागेत या कार्यक्रमांसाठी जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोक

मुंबईत नवीन वर्ष आणि सुट्टीचे दिवस असल्याने गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केलंय.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, "कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही."




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.